सोमवार 15 ऑगस्ट 2011

ही गोष्ट आहे पिंटूची.... ४ वर्षाच्या पिंटूची गोष्ट त्याच्याच शब्दात.... त्याचे विचार... त्याचे छोटेस विश्व... आणि त्याची स्वप्ने....

ही गोष्ट आहे पिंटूची.... ४ वर्षाच्या पिंटूची गोष्ट त्याच्याच शब्दात.... त्याचे विचार... त्याचे छोटेस विश्व... आणि त्याची स्वप्ने....

भाग १

मी प्रशांत शांताराम तेजम . आई - पप्पानी सांगितले आहे नाव विचारले कि , पूर्ण नाव सांगावे . मला ना पप्पांना 'बाबा ' बोलायचे असते पण माझ्या पप्पांच्या आईने बाबाला 'पप्पा' बोलायला शिकवले म्हणून सवय झाली . तिला 'आजी ' बोलले आवडत नाही . मला कारण माहित नाही पण कदाचित तिला Old झाल्यासारखे वाटत असेल .... जाऊदे .... माझे असे आहे की सांगायचे असते ते राहते आणि नको ते सांगतो म्हणून आई सारखी इतरांना सांगत असते कि 'पिंटूच्या नादी लागू नका '....
पिंटू म्हणजे मीच ....

हां मी कुठे होतो ? माझे नाव सांगून झाले... आता सगळे म्हणतात की मी आता मोठा झालो आहे, शाळेत जायला हवे. शाळा लवकरच सुरु होणार आहे. या मोठ्या लोकांना काही कळतच नाही, कधी चूक झाली तर म्हणतात की "मोठा झाला आहेस " आणि ते करतात ती कामे केली तर म्हणतात की "अजून लहान आहे" नक्की मी कोण आहे ????

जाऊदे ना.... मला वाटते कि, अजून मी लहान आहे कारण आजोबा म्हणतात कि मी फक्त पावसाळे बघितले आहेत पण मला वाटते की मी पावसाळे , उन्हाळे आणि हिवाळे बघितले आहेत. त्यांना हे मोजून सांगितले की ते हसतात. मी काही बोलले की ते असेच हसतात. गेल्यावेळी असेच झाले. झाले काय मला रस्त्यावरून चालताना मला दुकानाची नावे, बस नो वाचायची सवय आहे. एका Truck वर लिहले होते "बुरी नजर वाले तेरा मुंह काला". मग मी म्हणालो की, बुरी नजर ही तो डॉक्टर को दिखाव, मुंह कायको काला करने को ? असे बोललो आणि ते हसायला लागले.... का हसले माझ्या उत्तराला की हिंदीला ?

नुकताच हिंदी फिल्म्स बघायला सुरवात केली आहे ... मी TV वर अमर अकबर अंथोनी बघितला.... खूप मोठा होता Picture.... काय काय होते त्यात 3 भाऊ हरवतात मग परत भेटतात.... आईचे डोळे साई बाबा परत आणतात.... चांगले प्राण पप्पा वाईट होतात परत चांगले होतात.... मी तर दमलो सगळे लक्षात ठेवता ठेवता.... काल मी बबली कडे गेलो होतो खेळायला तेंव्हा ' सत्यम शिवम सुंदरम' फिल्म लागली होती माहित नाही का पण मला त्याच्या पप्पानी आम्हाला 'सत्यम शिवम सुंदरम' फिल्म बघायला दिली नाही.... ते म्हणाले चांगला नाही आणि आम्हाला खेळायला पाठवले, मी परत आलो तर ते बघत होते ती फिल्म .... जाऊदे ना.... मी नंतर कधी तरी बघेन.... चला Bye.... मी आता खेळायला जाणार आहे ...

- पिंटू

गुरुवार 13 मे 2010

मी तिरस्कार करतो माझाच....

मी तिरस्कार करतो माझाच....
मी तिरस्कार करतो माझ्यातील प्रत्येक गोष्टीचा....
मी तिरस्कार करतो माझा मी असण्याचा....
मी तिरस्कार करतो माझा कुणी नसण्याचा.....

का नाही मी सुंदर ?
का नाही मी कुणासाठीच खास ?
मी निषेध करतो माझाच तिरस्कार करण्याचा....!

कधी वाटते की,
हे तिरस्काराचे जळते निखरे डोक्यावर ठेवलेत....
सतत धगधग....संशयाची हवा...
हवा त्याला विझू देत नाहीं....
वाटते की मला घेऊनच जळणार ...

कधी कधी राग येतो की वाटते की,
एवढा तिरस्कार करतो तर करावी ओकारी
आणि बाहेर काढाव्या साऱ्या भावना....

कधी वाटते हे जगणे.... जगणे आहे का ?
श्वास घेतो म्हणजे जगणे नाहीं...
भूक लागली की पोटात काहीतरी ढकलणे म्हणजे जगणे नाहीं....
ह्रदय धडकते पण त्याला धड्कायला काही कारण तर हवे....
कशाला खोट्या भ्रमात राहू आणि दिवस ढकलण्याला जगणे म्हणू....

कधी वाटते की....हे तिरस्कराचे धुक्याने
माझे मन (जे खरोखर असते का माहित नहीं),
माझे डोके (जे जागेवर नहीं असे लोक म्हणतात),
आणि माझे डोळे (जे असून सुद्धा नसल्यासारखे आहेत) व्यापून टाकले आहेत...
काहीच कळत नाहीं...काहीच दिसत नाहीं...
राग येतो या गोष्टीचा.... मनापासून तिरस्कार करतो...

आता कुणी नाहीं माझे... आणि मी कुणीचा नाहीं...
नाहीं कुणी माझे जो मला परत तुमच्यात आणेल....
दरवेळी मीच मला समजावायचे....
मी दिलेल्या जखमेला.. मीच औषध लावायचे....
न कुणी येणार.... जवळ घ्याला...
फुंकर घालायला...

राग येतो रडायला
राग येतो आरशात बघायला
राग येतो मरणाचा विचार येतो म्हणून
राग येतो भावानांच्या आहारी जातो म्हणून

अर्धवट....
will complete in two days....

रविवार 28 जून 2009

आठवणींची बस

सकाळेच ८:१५... नेहमीप्रमाणे ३३२ बस अंधेरीवरुन... आज यात दोन गोष्टींची भर..एक म्हणजे पाउस आणि मेघना पेठे यांचे दुसर्यांदा वाचायला घेतलेले 'नातिचरामि'.

काही पुस्तके वाचून वाटते की... नाही वाचले तरी चालले असते काही विचार करायला
लावतात...काही वाचायला होत नाही even though फार popular असतात.
पण... काही पुस्तके अशी असतात की विचार करणेच बंद होते... एकदम सुन्न... त्यातलेच एक पुस्तक म्हणजे "नातिचरामि". सोबत लव आज कालचे मस्त गाणे (अजी दीन चढेया तेरे रंग वरगा)... असे वाटत होते की पूर्ण भरलेल्या बसमध्ये मी एकटाच आहे....

पुस्तक वाचताना मला अनेक जुने क्षण आठवले... जेंव्हा जेंव्हा मी एकटा असतो ना
(म्हणजे आजुबाजुला लोक असतात पण फ़क्त नाममात्र ) तेव्हां अचानक माझ्या
आजुबाजुचा परिसर एकदम बदलतो एकदम हॉलीवुड sci-fi movie... आजुबाजुचा परिसर
एकदम बस स्टेशनमध्ये बदलून जातो... आणि मी मान खाली घालून दोन्ही हात खिशात
घालून उभा आहे.... कुठली तरी (आठवणींची) बस येते. मी आपल्याच धुंदित किवा
संमोहित अवस्थेत... कुणी तरी पाठून धक्का देते असे वाटते अणि मी बसमध्ये
चढतो..कुठल्यातरी सीटवर जावून बसतो...Conductor नाही बसमध्ये... कुठे जायचे
नाही माहित ... केवळ एक एक आठवणीँचे stops येतात..मी अजुन ही त्याच संभ्रमावस्थेत...बस मधे मावणार नाही एवढ्या आठवणी जमा होतात.. डोक्याचा भुगा होतात...
त्यावेळी असा का वागलो... हे का नाही केले... तिला ते का नाही बोललो... ते केले असते तर...
दोष देत नाही मला पण काही तरी कमी वाटते.
..

मग अचनक बस कुठेतरी थांबते...मी उतरतो का ते माहित नाही... कुठे उतरलो ते आठवत नाही... कुठली जागा ते आठवत नाही...

मग पुन्हा "माणसात" यायला २-४ दिवस लागतात... depends कधी जास्त कधी कमी...

बुधवार 11 मार्च 2009

'तो' ला कसे ओळख़ाल ?

प्रसंग - १
रात्रीचे ८:३०. ट्रेनमध्ये तुरळक गर्दी. 'तो' दोन सीटमध्ये उभा. तोच्या मागे एक माणूस सुडोकू सोडवत आहे. थोडेसेच सोडवायचे बाकी आहे. 'तो' मस्तपैकी गाणी ऐकत आहे. त्या माणसाचे सुडोकू सोडवुन झाले आणि मस्तपैकी कुस्ती जिंकलेल्या पहिलवानासारखा आजुबाजूला बघत होता . अशावेळी जो टाळी वाजून त्याचे कौतुक करेल ना तो म्हणजेच 'तो' .... (can u imagine the reaction of that man ?)

प्रसंग - २
रात्रीचे ११:४५. ट्रेनमधे As usual तूफान गर्दी. 'तो' ला सॉलिड झोप. तेवढ्यात एक अमोल पालेकर टाईप माणूस 'तो' ला विचारतो, "हा मोबाइल कितीला घेतला ?" अशावेळी जो म्हणतो की, "माहित नाही.. मी तर हा चोरला आहे...!" असा म्हणनारा नक्की 'तो' (अमोल पालेकरचे पुढे काय झाले काय माहित ?)

प्रसंग - ३
जो बसमधून उतरताना शेवटच्या पायरीवरून दोन पायांवर ऊडी मारतो तो म्हणजे 'तो' . तोचे असे विचार आहेत की ज्या दिवशी तो असे करत नाही ना त्यादिवशी कुछ तो गड़बड़ है... तो अपसेट आहे.. म्हनून 'तो' कितीही टेंशन मध्ये असला तरी ऊडी मारतोच. (Ya I know this is weird..')

प्रसंग - ४
बस नं.३३२ ची रांग . जो मोबाइल वर गाणी ऐकत आहे. (by the way, 'तोने' नुकताच Nokia 5800 घेतला आहे. ही सुध्दा त्याला ओळख़ण्याची एक निशानी आहे :) ) आणि जो गाणी ऐकत असताना कोण त्याच्याकडे बघते आहे नाही बघत याची काळजी न करता Dance करत आहे ना तो म्हणजेच 'तो' (He loves dancing. Dance like no one watching)

still many more.....

God dont love me so much

Hey God dont love me so much... S T R A N G E na !!! But really dont love me so much. I know you love me. As it is said that "We hurt those people to whom we love most " so please God dont love me too much. I already hurt so much and cant take it anymore. too much trauma...unbearable anguish...

Hey but don’t stop loving me absolutely.... I need it now much more as it is said that "Love someone when he least deserve it".

But what’s love ???

Its attachment.... addiction.... caring.... without expectation... really without any expectation ????
Its not easy God... Ya... I know still its true.

Its better to be far away from this topic.


From 'far away' word just remembered one nice song which is now in my playing list and that is 'Far away - Nickelback '
Far Away lyrics

This time, This place
Misused, Mistakes
Too long, Too late
Who was I to make you wait
Just one chance
Just one breath
Just in case there's just one left
'Cause you know,
you know, you know

[CHORUS]
That I love you
I have loved you all along
And I miss you
Been far away for far too long
I keep dreaming you'll be with me
and you'll never go
Stop breathing if
I don't see you anymore

On my knees, I'll ask
Last chance for one last dance
'Cause with you, I'd withstand
All of hell to hold your hand
I'd give it all
I'd give for us
Give anything but I won't give up
'Cause you know,
you know, you know

[CHORUS]

So far away
Been far away for far too long
So far away
Been far away for far too long
But you know, you know, you know

I wanted
I wanted you to stay
'Cause I needed
I need to hear you say
That I love you
I have loved you all along
And I forgive you
For being away for far too long
So keep breathing
'Cause I'm not leaving you anymore
Believe it
Hold on to me and, never let me go
Keep breathing
'Cause I'm not leaving you anymore
Believe it
Hold on to me and, never let me go
Keep breathing
Hold on to me and, never let me go
Keep breathing
Hold on to me and, never let me go

रविवार 1 फेब्रुवारी 2009

Again....

Hey...I dont know why I m starting this blog again.... and when I will update it agian...
Most of things are very personal, complex and unimportant.....sometime laziness..... these are the some reasons of not updating ma blog.
So many topics for writting......Thanks ppl for motivating to write again

Lets start with this...


When I dont Know the answer of Yes/No type question..
At that time, I always go with Yes....

When she proposed me...hmmm... I said YES...


When I have to lie ....I lie because...
someone should be happy

Yesterday, She asked do you love me ?..hmmm..I said YES...


When someone close to me ask whether I missed her ?
I answered NO...because for missing someone I have to first forget that person..

She asked me "Do you missed me" ? I said YES.........................
...

..
...
...
.....

One day She told me that, "I want to discontinue this relation" ..
I said "NO"...Please dont...

She Said "YES. I will".




शनिवार 22 नोव्हेंबर 2008

The Last Post

Hey ppl, I m not going to update ma blog anymore. Actually I never posted my all article and poems here..... most of the times they are in my diary. Dont know why but suddenly I have taken a this decision.

I am not going to delete this blog.

Thanks for ur comments, calls and emails....

धन्यवाद !!!

बुधवार 22 ऑक्टोबर 2008

तो अन् ती


तो ...

तो जरा वेगळा
मस्ती करणारा,
सदैव आनंदी :) ... थोडासा वेडा
लोकाना मदत करणारा
प्रेम काय असते ते लोकांना सांगणारा
(पण त्याला कळ्ले नव्हते... तसे आतापर्यंत त्याला नऊवेळा झाले आहे)
आपल्याला तो कळला असं वाटताच काहिसा विचित्र वागणारा
सगळ्यांना आवडणारा पण या रा्वांना एकटे राहायला आवडते
("मी मित्रांचा बेस्ट फ्रेंड आहे पण माझा कुणीही मित्रही नाही" - इति तो)
कधीही काहीही करेल,कधीही मूड बदलेल
एकदम unpredictable असा तो...


ती ...


ती तिच्यासाठी काय लिहू ?
तीही जरा मस्ती करणारी
पण सदैव तक्रार करणारी
जास्त वेडी.... थोडी हुशार
डोक्यापेक्षा मनाने विचार करणारी
खरं प्रेम एकदाच होतं असं माननारी
(जे होऊन गेले "होते"... पण आता एकटी)
गोड़ असली तरी .... कमी मित्र-मैत्रिणी असलेली
पण मैत्रीसाठी काहीही करणारी
दुखाला सदैव कुरुवळणारी
आज काल नाही दिसत तिच्यासारख्या मुली :(

पण दोघांत एक Common होत ते म्हणजे ते दोघे स्टार होते...एकदम सुपरस्टार....!

तुम्हांला आवडेल का त्यांची कहाणी ऐकायला ?


सोमवार 6 ऑक्टोबर 2008

तुझी माझी भेट


तुझी माझी भेट
नेहमीच अर्धवट राहते
हातात हात येईपर्यन्त
ांज उलटून जाते ....




गुरुवार 25 सप्टेंबर 2008

अस्वस्थ...



काल दोन-तीन वर्षयाचे मुल रडत होते
भावाने त्याला खेळाला घेतले... तरीही ते रडत होते
बहिणीने त्याला नाचून दाखवले... तरीही तेच

आईने त्याला उचलून घेतले, गाणे गायले... तरीही
बापाने त्याला चौकलेट दिले... तरीही ते रडत होते
जेव्हा त्याच्या बापाने त्याला दोन रुपयाचे नाणे दिले...तेव्हा ते शांत झाले...!
अन मी अस्वस्थ झालो...

किती लवकर तो शिकला सारे..
किती लवकर तो मोठा(?) अणि mature(?) झाला..
किती लवकर त्याचे बालपण संपले....



गेल्या आठवद्यांत ट्रेनने आँफिसला जाताना एक लहान मुल, माझ्या जवळ उभे राहिले
अन वाटले हा आता भिक मागणार...
पण ते सरळ पायात पडला....
आणि सीटखालचा कचरा गोळा करायला लागला
सगळा कचरा गोळा करून त्याने ट्रेनमधुन बाहेर फेकला आणि परत आला
मला बघायला लागला त्याचे तसे बघणे अस्वस्थ करून गेले
कधीही भिकार्याला पैसे न देणारा मी पण त्याला पैसे दिले...
पण त्याच्या चेहर्यावरचे भाव हे भिक घेताना असतात तसे नव्हते..
असे वाटत होते की तो त्याचे हक्काचे पैसे मागतोय (Just Like Angry Young Man)




दादरवरुन वरळीला बसमधुन येताना बघितले की,
बाजूला सिग्नलला उभ्या असलेल्या कचर्याच्या गाडीला एक Teddy Bear बांधला होता...!
तो तिथून पडु नये म्हनून त्याच्या गळ्याला तारेने बांधले होते...
(See the image... I have taken that snap from bus)







पुन्हा अस्वस्थ....! का फेकला असेल त्याला ???

कदाचित तो Teddy कुणाला भुतकाळाची आठवण करून देत असेल...
कदाचित कुणाला नविन Teddy भेटला असेल....
कदाचित कुणाला नविन Teddy हवा असेल...


मित्रांबरोबर मस्तपैकी गप्पा मारताना ....
समुद्रावर असताना ....
सुर्याला निरोप देताना ...
कितिवेळा असा अस्वस्थ होतो....काय असतो हा अस्वस्थपणा...


(वरील सारे किस्से खरे आहेत....Just added some few things and inner thoughts)